जिल्ह्यात आज ९८ कोरोना बाधितांची वाढ

Foto
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी आलेल्या अहवालानुसार ९८ कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही १६५८८ वर जाऊन पोहचली आहे. 

आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण १६५८८ कोरोनाबाधितांपैकी आतापर्यंत १२१४६ जण बरे झाले तर आजपर्यंत ५३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३९०३ रुग्णांवर उपचार सुरु आहे. 
ग्रामीण भागात ६१ रुग्णांची वाढ
ग्रामीण भागात आज ६१ कोरोनाच्या रुग्णांची वाढ झाली आहे. त्यात खंडोबामंदिर परिसर, गंगापूर-२, सिडको महानगर, बजाजनगर -१,अयोध्यानगर, बजाजनगर-१, बीएसएन गोडाऊन परिसर -१, बजाजनगर -३, मनाली रेसिडन्सी परिसर, सिडको महानगर, बजाजनगर-१, गांधीनगर, रांजणगाव-१, छत्रपतीनगर, बजाजनगर-१, भाटिया गल्ली, वैजापूर-३, दत्तनगर, वैजापूर -१, गांधी मैदान, वैजापूर-१, इंगळे गल्ली, वैजापूर-२, दुर्गानगर, वैजापूर-३, सिल्लोड पंचायत समिती परिसर -१, गाडगे महाराज चौक परिसर,सिल्लोड-१ , कासोद,सिल्लोड-१, समतानगर, सिल्लोड-४, टिळकनगर, सिल्लोड-१, जयभवानीनगर, सिल्लोड-१, काळे कॉलनी, सिल्लोड-२, जैनोद्दीनकॉलनी, सिल्लोड-१, स्नेहनगर,सिल्लोड-२, आंबेडकरनगर,सिल्लोड -२, डायगव्हाण, करमाड-१, सिद्धेश्वरमंदिर परिसर, धोत्रा, अजिंठा -३, अन्वा रोड, धोत्रा-२, शिवना रोड, धोत्रा -२, हायस्कूल परिसर -२, लेननगर, वाळूज-२, वाळूज पोलिस स्टेशन परिसर-२, मथुरानगर, कमलापूर, जिकठाण-१, टाकळी, पैठण-१, केसापुरी-४, डवला, वैजापूर-४ या भागातील रुग्णांचा समावेश आहे. 
शहरात ३७ रुग्ण
शहरात ३७ रुग्ण वाढले आहेत. त्यात राजनगर-३, मुकुंदवाडी-१, चिकलठाणा-१, पहाडसिंगपुरा-१, चाँदमरी-१, फकीरवाडी, औरंगपुरा-१, पुंडलिकनगर-१, जवाहर कॉलनी-१, जे-सेक्टर, मुकुंदवाडी-१, जय भवानीनगर, गल्ली क्रमांक तीन-२, स्वराजनगर, मुकुंदवाडी-१, श्रेयनगर-१, नारेगाव-१३, एन दोन सिडको-१, जयभवानीनगर-१, न्यू बालाजीनगर-१, खंडोबा मंदिर परिसर, सातारा-१, गणेश कॉलनी-३, बनेवाडी, रेल्वे स्टेशन परिसर -१, रोशनगेट-१ या भागातील रुग्णांचा समावेश आहे. 
चार कोरोनाबाधितांचा मृत्यू
शहरातील खासगी रुग्णालयांत सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील ६४ वर्षीय स्त्री व ६५ वर्षीय पुरूष, कन्नडमधील ५५ वर्षीय स्त्री, बीड बायपास येथील ७५ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.